Menu
गाईसाठी दान देणं आणि मागणंही पूण्यच!
आमच्या या गोपालनाच्या अनोख्या उपक्रमात आम्ही सातत्याने काहीतरी नवं करण्यासाठी धडपडत आहोत. त्यासाठी निधी हा कायमच लागणार आहे. तो निधी मागण्यासाठी दान मागण्यात आम्हाला जराही संकोच वाटत नाही. कारण हे सामाजिक पूण्याचं काम आहे. ते एकट्यादुकट्यानं करायचंच नसतं. सगळ्यांचे हात त्यासाठी लागायला हवेत. म्हणूनच विविध मार्गांनी आम्हाला मदत करा.
गाय दत्तक घ्या
तुम्ही आमच्या गोशाळेतील एक गाय दत्तक घेऊ शकता. तिला तुमच्या आवडीचं नाव देऊ शकता. तिची सेवा थेट इथे येऊन करू शकता. नाहीच जमलं यायला तर ऑनलाइन विचारपूस तर करूच शकता.
रु. १,५०,०००
एका गायीचा चारा
एखाद्या गायीसाठी वर्षभर लागणाऱ्या १०० टक्के नैसर्गिक चाऱ्यासाठी उत्पादन, वाहतूक आणि नियोजन याच्यासाठी लागणाऱ्या खर्चात तुम्ही तुमचा वाटा देऊ शकता.
रु. २,०००+
एका गायीसाठी औषधपाणी
गायीला जसे चारापाणी लागतं तसंच गाईला औषधपाणीही लागतं. वेगवेगळ्या आजारांपासून, साथीपासून तिची काळजी घेण्यासाठी लागणाऱ्या या खर्चाचा भार तुम्हीही उचलू शकता.
रु. १,०००+
गोठा विकास निधी
गायीसाठी बांधले जाणारा गोठ्यात सतत काम करत राहावे लागते. त्यातील माती बदलण्यापासून नव्या सुविधा करण्यासाठी लागणाऱ्या कामात सहकार्य करा.
रु. ५,०००+
ज्येष्ठ गायींचे आश्रयदाते
ज्या गायी वयाने वाढल्या आहेत, त्यांना भाकड गायी म्हणतात. आम्हाला हे मान्य नाही. आमच्यासाठी घरातील आजीआजोबांसारख्या त्या ज्येष्ठ गायी आहेत. त्यांच्या संगोपनाचा वाटा उचला.
रु. ५,०००+