आमचं ध्येय
गायींच्या संगोपनामागे निसर्गस्नेही गोपालनाचा आदर्श घालून देणे हे महत्त्वाचं ध्येय आहेच. पण, त्यासोबत स्थानिक शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी काही तरी भरीव काम व्हावं, असा देखील आमचा प्रयत्न आहे. त्यामुळेच आपल्या आसपास आपल्यासोबतच राहणाऱ्या या काळ्या मातीतल्या बंधुभगिनींना सहकारातून रोजगार उभा करणे, हेही या गोशाळेचं ध्येय आहे.
आमचा मार्ग
आज लोकांमध्ये सकस आणि विषमुक्त दुधाची मागणी वाढते आहे. त्यासाठी सेंद्रीय पद्धतीनं होणारं दुधाचं आणि दुधावर आधारीत उत्पादनांची निर्मिती हा आमचा मार्ग आहे. हे दूध मिळविण्यासाठी लागणाऱ्या गायींच्या संगोपनासाठी सर्वोच्च प्राधान्य दिले गेले आहे. त्यासोबतच नव्या गायीच्या गुणवत्ता चांगली राहावी यासाठी गायींच्या पुनरुत्पादनासाठीही सातत्यानं संशोधन आणि प्रयोग करण्यात येत आहेत.

अहिल्या गोशाळा का गरजेची आणि महत्त्वाची आहे?

अहिल्या गोशाळा हा कृषीप्रधान अर्थव्यवस्थेला एकविसाव्या शतकातील आधुनिकतेच्या चौकटीतही मानाचं स्थान देण्याचा प्रयोग आहे. आम्हाला एका बाजूला गायींचं सर्वोत्तम वाण जपायचं आहे, तर दुसऱ्या बाजुला उत्तम दूध, दही, तूप यांच्या ताकदीवर आरोग्यपूर्ण समाज घडवायचा आहे. हे करत असताना, आमचा बळीराजा समृद्ध होईल, हे काही वेगळं सांगायलाच नको.
त्यासाठी आम्ही येवले शहराजवळील विस्तीर्ण शेतजमिनीने वेढलेल्या ठिकाणी अहिल्या गोशाळेची निर्मिती केली आहे. येथे आसपास असलेली पाण्याची धरणे आणि जलाशयांमुळे येथील भूजल पातळी चांगली आहे. तसेच आजही येवले शहराचा पाया हा शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे पशुपालन आणि दुग्धव्यवसाय समृद्ध करण्यासाठी ही उत्तम जागा आहे.
जसं आज येवले हे पैठणीसाठी ओळखलं जातं, तसंच उद्या दुग्धोत्पादनातील आरोग्यसंपन्न आणि निसर्गस्नेही प्रयोगासाठी ओळखलं जावं, हे आमचं स्वप्न आहे. त्यासाठी आजूबाजूचे शेतकऱ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून आधी आम्ही हा प्रयोग यशस्वी करून दाखवणं गरजेचे आहे. त्यासाठी एकीकडे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि दुसरीकडे पारंपरिक शहाणपण याचा उत्तम समन्वय करण्यासाठी आमची सतत धडपड सुरू आहे.

छोटी पावले, मोठी स्वप्ने

येवले हे आदर्श गोपालनाचा आणि कृषीसंपन्नतेचा आदर्श ठरावा हे एक छोटे पाऊल आहे. त्यातून आपल्याला घडवायचं काय आहे, तर त्यातून धडा घेऊन देशभर, जगभर दुग्धोत्पदनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवाय. कारण आज क्लायमेट चेंज म्हणजेच पर्यावरणाची हानी हा मानवजातीपुढला सर्वात महत्त्वाचा प्रश्न बनलाय. आपल्या या प्रकल्पामधून पर्यावरणाच्या प्रश्नावर उत्तर शोधून पर्यावरणस्नेही आयुष्य माणसाला जगता यावं, हे आमचे सर्वोच्च उद्दिष्ट्य आहे. पण फक्त उद्दिष्टाकडे नजर लावून, स्वस्थ बसता येत नाही. त्यासाठी रोज थोडी पावले चालावीच लागतात, हेच खरं.

नैसर्गिक गोपालन कसं होतं?

आज जगभर गायीचं दूध ज्या पद्धतीनं जमवलं जातं ते आम्हाला मान्य नाही. ती निसर्गाची केलेली हानी आहे, असं आमचं मत आहे. त्यासाठी स्वच्छता, निसर्गनियम आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांची सांगड घालण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आम्ही आमच्या मुक्त गोठ्यात गायींना बांधून ठेवत नाही. त्यामुळे त्या मोकळेपणानं फिरतात. कोणतीही गोष्ट तुम्ही जास्त ताणली की तुटते. तसंच गाय ही निसर्गाचं देणं आहे. तिला ओरबाडून, पिळवटून सकस दूध मिळणार नाही. म्हणूनच मुक्त गोठ्यात होणारं नैसर्गिक संगोपन अत्यंत महत्त्वाचं आहे.

नैसर्गिक अन्नातून घडतं नैसर्गिक दूध

व्यावसायिकरित्या होणाऱ्या दुग्धनिर्मितीसाठी गायींना नैसर्गिकरित्या निर्माण झालेलं खाद्य दिलं जात नाही. त्याऐवजी रासायनिक प्रक्रिया केलेलं खाद्य खायला घातलं जातं. त्यांना इंजेक्शन, औषधे देऊन दुग्धोत्पादन वाढवतात. हे सगळं न करता पूर्णपणे नैसर्गिक आणि वेज्ञानिक पद्धतीनं गोपालन करता येतं, हेच आम्ही आमच्या गोशाळेत दाखवून देतो. गोठ्याच्या आकारापासून दूधावरच्या प्रक्रियेपर्यंत सर्व प्रक्रियेत निसर्गाच्या नियमाविरुद्ध काहीही होणार नाही, याची आम्ही दक्षता घेतो. त्यामुळे संपूर्ण नैसर्गिक प्रक्रियेमुळे आमचं दूधही १०० टक्के नैसर्गिकच असतं.

आमची वैशिष्ट्ये

शुद्ध देशी गाईगुरे

आज आमच्याकडे शुद्ध देशी आणि उत्तम दर्जाची २०७ गाईगुरे आहेत. त्यांचे वैज्ञानिक आणि नैसर्गिक पद्धतीने गोपालन होत आहे. या प्राण्यांची संख्या भविष्यात आणखी वाढविली जाईल.

उपलब्ध विस्तीर्ण शेतजमीन

आज संस्थेकडे जवळपास ७.७ एकर एवढी विस्तीर्ण शेतजमीन उपलब्ध आहे. त्यामुळे गोपालनासाठी आणि दुग्धोत्पदनासाठी लागणाऱ्या गरजा एकत्र पूर्ण होऊ शकतात.

उत्तम हवापाणी

अत्यंत निसर्गरम्य अशा ठिकाणी असलेल्या या गोशाळेच्या परिसरात हवेची गुणवत्ता उत्तम आहे. नैसर्गिक स्वच्छ सूर्यप्रकाश आणि भरपूर पाणीही उपलब्ध आहे.

आधुनिक व्यवस्थापन

दूध काढणे, दुधाची हाताळणी, दुग्धप्रक्रिया, गायीगुरांची स्वच्छता, त्यांचे लसीकरण यासाठी आधुनिक आणि वैज्ञानिक पद्धतीचे व्यवस्थापन कार्यरत आहे.

प्रशिक्षित सेवाभावी मनुष्यबळ

कोणताही उपक्रम यशस्वी करतात ती तेथील माणसं. आमच्या या अहिल्या गोशाळेमध्ये काम करणारे सर्वजण हे प्रशिक्षित आहेतच, पण ते सेवाभीावी वृत्तीने इथे काम करतात.

निसर्गरक्षणासाठी कटिबद्ध

हा सगळा खटाटोप कशासाठी? या प्रश्नाचं उत्तर निसर्गासाठी आणि निसर्गातील माणसाच्या अस्तित्वासाठी. गायींच्या माध्यमातून निसर्गाचं ऋण फेडण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत.