Menu
गोशाळेत एक दिवस
आपल्या या गोशाळेत एक पूर्ण दिवस राहण्यासाठी या. येथे तुम्हाला आमची गोपालनाची पद्धत समजून घेता येईलच, पण सोबत तुम्ही गायीेंची सेवाही करू शकता. तसेच निसर्गरम्य वातावरणात आल्याचा आनंद तुम्हा उपभोगता येईल, ते वेगळेच.
गोशाळेत काही तास
संपूर्ण दिवस तु्म्हाला गोशाळेसाठी देणं शक्य नसेल तर तुम्ही काही तासांसाठीही इथं येऊ शकता. गोशाळा पाहणे, गोसेवा करणे यासोबत येथील पर्यावरणाचा आस्वाद घेणे आणि आमच्या इतर उपक्रमांमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता.
गायींसोबत भोजनाचा आनंद
गायींना अन्न घालणे हे आपल्याकडे पवित्र मानले जाते. पण तुम्ही इथे येऊन गायींना खाऊ घालाच, पण सोबत तुम्हीही गायींच्या सहवासात गावरान भोजन घेऊ शकता. त्यामुळे गोसेवेचे पूण्य आणि सोबत गावाकडल्या जेवणाचा आनंदही तुम्हाला मिळेल.
गायींसोबत तुमचं सुखदुःख जोडा
आपला वाढदिवस, आपल्या जवळच्यांचा वाढदिवस, सण, समारंभ इथपासन कुणाचा स्मृतिदिन अशा दिवशी गोसेवा करणे पवित्र मानले जाते. त्यासाठी तुम्ही इथं येऊन तुमचं गोसेवेचे पूण्य मिळवू शकता. निसर्गाचा हा आशीर्वाद तुमची मनोकामना नक्कीच पूर्ण करेल.