Ahilya Goshala

गोपालनचा नवा प्रयोग असलेल्या

अहिल्या गोशाळेत
आपलं स्वागत!

आमची गोशाळा म्हणजे फक्त गाईंचा गोठा नाही. ही आहे शाळा. जिथे गाय आपल्याला शिकवते निसर्गाचे धडे. याच भावनेने उभारलेल्या गोपालनाच्या आधुनिक प्रयोगामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. निसर्गाच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करून, गाईला कोणताही त्रास न देता, मुक्त गोठा पद्धतीने होणाऱ्या गाईंच्या संगोपनाची, दुग्ध उत्पादनाची आणि चिरंतन टिकणाऱ्या निसर्गनात्याची ही यशोगाथा आहे. आपणही या प्रयोगात सहभागी होऊन या यशोगाथेतील एक अभंग व्हा.

आमच्या गोशाळेत नक्की वेगळं तरी काय?

दुधासोबात गाईच्याही गुणवत्तेचा विचार

साधारणतः कोणत्याही दुधाबाबत आमचं दूध किती गुणवत्तापूर्ण आहे, त्याची जााहिरात केली जाते. पण दुधासोबत आमची गायही गुणवत्तापूर्ण आहे. तिच्या आरोग्याचा विचार आम्ही दुधापेक्षाही जास्त महत्त्वाचा मानतो.

निसर्गाच्या सानिध्यातील दुग्धोत्पादन

हिरव्यागार निसर्गाने बहरलेल्या जवळपास साडेसात एकर परिसरात आमची ही गोशाळा आहे. तिथे मुक्त गोठा पद्धतीने आमच्या गाईंचे संगोपन गेले जाते. त्यामुळे या गाईंपासून मिळणाऱ्या दुधाची गुणवत्ता ही इतर दुधापेक्षा प्रचंड वेगळी आहे.

चारा म्हणजे गवत नव्हे, नैसर्गिक अन्न

गाईसाठी कोणताही हिरवा चारा दिला म्हणजे झाला, असे आम्ही मानत नाही. आमचा चाराही युरियासारखी खते न वापरता, आम्ही स्वतःच तयार करतो. त्यामुळे हा १०० टक्के नैसर्गिक चारा गाईच्या पोषणात आणि दुधाच्या गुणवत्तेत मोलाची भर घालतो.

हा आमचा धंदा नाही, ही निसर्गसेवा

सर्वात मुख्य म्हणजे हा आमचा पोटापाण्याचा किंवा पैसे कमावण्याचा धंदा नाही. भारतीय संस्कृतीमध्ये सातत्यानं सांगितलेल्या माणूस आणि निसर्गाच्या नात्याची खूण असणारे हे गोपालन. त्यातील शुद्धता आणि पावित्र्य आचंद्रसूर्य टिकून राहावं यासाठी आमचा हा प्रयत्न आहे.

शेतकऱ्यांचा अनुभव कसा मोजणार?

आमच्या या गोशाळेला पाच वर्षं झाली असून, आम्ही सातत्यानं नवनवे प्रयोग करतोच आहोत. मुळातच आम्ही शेतकरी असल्यानं पिढ्यानपिढ्याचा आमचा अनुभव कॅलेंडरच्या वर्षांमध्ये कसा मोजायचा?

आमच्या उत्पादनांची गोष्ट वेगळीय

कोणतंही बाजारातील तूप घेतलंत तर ते दुधापासून क्रिम काढून बनवतात. पण, आम्ही घरच्याप्रमाणे दुधाचं दही, दह्याचं ताक, ताकाचं लोणी आणि लोण्याचं तूप करतो. त्यामुळे त्याची बातच न्यारी हाय.

गायीचीही जात काढायची नाय, पण…

आता कोणाचीच जात काढायची नसते. पण गायीची जात पाहिली तरच आपल्याला तिची किंमत कळते. आमच्या सगळ्या शुद्ध जातीच्या, म्हणजे बिलकुल संकरीत नसलेल्या आहेत. शुद्ध देशी गायी.

दूध-तूपाच्या पलिकडची गोउत्पादने

गाय दूध देते हे सगळ्यांना माहित्येय. पण गाय शेण पण देते. त्या शेणाच्या आम्ही विटा बनवितो. धूप बनवितो. पणत्या बनवितो. एवढंच नाही तर शेणखतही बनवून पून्हा निसर्गाला समृद्ध करतो.

ई-डेअरी

आमची उत्पादनं

गाईसाठी दान देणं आणि मागणंही पूण्यच!

आमच्या या गोपालनाच्या अनोख्या उपक्रमात आम्ही सातत्याने काहीतरी नवं करण्यासाठी धडपडत आहोत. त्यासाठी निधी हा कायमच लागणार आहे. तो निधी मागण्यासाठी दान मागण्यात आम्हाला जराही संकोच वाटत नाही. कारण हे सामाजिक पूण्याचं काम आहे. ते एकट्यादुकट्यानं करायचंच नसतं. सगळ्यांचे हात त्यासाठी लागायला हवेत. म्हणूनच विविध मार्गांनी आम्हाला मदत करा.

गाय दत्तक घ्या

तुम्ही आमच्या गोशाळेतील एक गाय दत्तक घेऊ शकता. तिला तुमच्या आवडीचं नाव देऊ शकता. तिची सेवा थेट इथे येऊन करू शकता. नाहीच जमलं यायला तर ऑनलाइन विचारपूस तर करूच शकता.

चाऱ्यासाठी मदत करा

एखाद्या गाईसाठी लागणाऱ्या १०० टक्के नैसर्गिक चाऱ्यासाठी उत्पादन, वाहतूक आणि नियोजन याच्यासाठी लागणाऱ्या खर्चात तुम्ही तुमचा वाटा देऊ शकता.

गाईसाठी औषधपाणी द्या

गाईला जसे चारापाणी लागतं तसंच गाईला औषधपाणीही लागतं. वेगवेगळ्या आजारांपासून, साथीपासून तिची काळजी घेण्यासाठी लागणाऱ्या या खर्चाचा भार तुम्हीही उचलू शकता.

कधी-कधी आकडेही खूप काही सांगतात

आमच्या या गोशाळेतील गाईंची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. तसंच उत्पादनामध्येही वैविध्य आणण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करतोय.
हून अधिक गायी.
0 +
हून अधिक देशी प्रजाती
0 +
हून अधिक उत्पादने
0 +
Marathi